- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

नागपूर समाचार : आरटीई फाउंडेशन व भाजप शिक्षक आघाडी वैद्यकीय आघाडी व महिला आघाडी तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आरटीई फाउंडेशन व भाजप शिक्षक आघाडी वैद्यकीय आघाडी व महिला आघाडी तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

नागपूर समाचार : आरटीई फाउंडेशन ,भारत च्या वतीने हरिसन लोन वाठोडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मुक्ती दिन, बालिका दिन व महिला शिक्षक दिन स्वराज पब्लिक स्कूल, वाठोडा नागपुर व स्वामी गजानन स्कूल, खरबी येथील विद्यार्थिनींना आरोग्य, कायदेविषयक, व मानसिक मार्गदर्शन देऊन जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाचे आयोजन आरटीई फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे हे होते त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र किती कठीण परिस्थितीतून त्यांनी समाजाला विशेष करून स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले तसेच समाजातील त्यांच्यावर झालेल्या टीका, हल्ले, त्यांनी काढलेला मार्ग, सती कायदा प्रतिबंध, पुनर्विवाह यावर प्रकाश टाकून शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे मुलींना बोध घेण्यास सांगितले.

सह आयोजक भाजप वैद्यकीय आघाडी पूर्व नागपूर अध्यक्ष डॉ हरीश राजगिरे होते, तसेच आरोग्यभारती संयोजिका डॉ मनिषा राजगिरे यांनी मुलींना उत्तम आरोग्यासाठी मार्गदर्शन केले.

प्रमुख अतिथी माजी महापौर भाजप शिक्षक आघाडी संयोजिका डॉ. कल्पना पांडे यांनी याप्रसंगी प्राचीन शिक्षण पद्धती मध्ये महिलांना स्थान यावर मार्गदर्शन केले, नागपूरच्या उपमहापौर मनीषा धावडे, नगरसेविका व माजी सभापती समिता चकोले, नगरसेविका व माजी उपमहापौर मनीषा कोठे, बेटी बचाव बेटी पधाव पूर्व नागपूर अध्यक्ष वर्षा मिलमिले, भाजप पूर्व नागपूर महिला अध्यक्ष निशा भोयर यांनी सुद्धा उपयोगी मार्गदर्शन केले, उपाध्यक्ष डॉली सारस्वत, वार्ड अध्यक्ष सिंधु पराते,भाजप ओबीसी मोर्चा महिला पूर्व नागपूर अध्यक्ष अर्चना धबाले, सामाजिक कार्यकर्त्या सुकेशीणी दहिवले, शीला वासमवार, रेवती गाठीबांधे, शीतल सोरते, रेखा ठवकर, रेणू द्विवेदी अनुसूचित जाती मोर्चा चे नागपूर शहर संपर्क प्रमुख निरंजन दहिवले उपस्थित होते.

स्वराज पब्लिक स्कूल च्या संचालिका स्मिता काळबांडे यांनी सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व प्रमुख अतिथी यांना सन्मानपत्र देऊन महिलांचा सन्मान केला, कार्यक्रमाचे संचालन रेणु द्विवेदी यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा मिलमिले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *