आरटीई फाउंडेशन व भाजप यांचे तर्फे आरोग्य व हेल्थ कार्ड शिबीर, ५०० गरजूंना लाभ
नागपूर समाचार : आरटीई फाउंडेशन ,भारत च्या वतीने खोडे उद्यान, नाईक रोड येथे नेत्र तपासणी, दंत चिकित्सा, महिला स्वास्थ्य शिबिराचे आयोजन करून औषध वाटप करण्यात आले, सोबतच खासदार हेल्थ कार्ड बनवून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यास वरदान ठरणारी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून मोफत औषधे सुविधा, पॅथॉलॉजी सुविधा, डायलिसीस सुविधा, नेत्र तपासणी रेडिओलॉजी सुविधा ,मानसोपचार, फिजिओथेरपी तज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय मार्गदर्शन रुग्ण वाहिनी, पेटी शव वाहिनी सुविधा अशा पद्धतीने भारत सरकार द्वारा व योजनेचा साठ वर्षा वरील वृद्धांना मार्गदर्शन करून त्यांचे नोंदणी करण्यात आली, तसेच गरजू जेष्ठ नागरिकांसाठी निशुल्क चष्मे वाटप, कर्णयंत्र ,काठी , व्हीलचेअर आदि वाटप ची सुविधा आहे त्याकरिता आयोजक आरटीई फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजप शिक्षक आघाडी राज्य सदस्य प्रा. सचिन काळबांडे यांनी घेतले, ह्यात भाजप वैद्यकीय आघाडी शहर अध्यक्ष डॉ गिरीश चरडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
केंद्र सरकार द्वारा असंघटित क्षेत्रातील कामगारांचा राष्ट्रीय डाटाबेस सीएनसी केंद्राच्या माध्यमातून वारी ही श्रम कार्ड बद्दल नागरिकांना माहिती देऊन त्यांचे कार्ड बनवून घेण्यात आले, सोबतच गरजूंसाठी संजय गांधी निराधार योजनांचा लाभ कसा मिळेल याचे मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले, सर्व योजना आरटीई फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे यांनी नागरिकांना समजावून सांगितल्या तसेच सर्व आयोजन केले, भाजप तर्फे नागपूर महानगरपालिका तर्फे मोफत आरोग्य सुविधा ज्यामध्ये नेत्रचिकित्सा शिबिर तसेच महिलांकरता विशेष शिबिर चे आयोजन करण्यात आले, सदर कार्यक्रमात मध्य नागपूर चे आमदार विकास कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूरच्या उपमहापौर मनीषा धावडे यांनी सुद्धा उपस्थिती दिली, नगरसेविका नेहा नरेश वाघमारे , भाजप पदाधिकारी बंडुजी राऊत , संपर्क प्रमुख अनिल मानापुरे,वार्ड अध्यक्ष प्रभाकर घुगे , भाजप पदाधिकारी राजीव गांधी, सुनील आंबेकर ,चितणविसपुरा प्रभात शाखेचे प्रमुख पदाधिकारी विलास माताडे ,प्रशांत उंबरकर, अतुल हाडगे,भाजप महामंत्री नंदू जाधव, राजेश काकडे, ललित ठाकरे, सुरेश पुराणिक, दिलीप देव,काशीनाथ मटाले, उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमात रमेश पांडे, दिलीप कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले , प्रा. सचिन काळबांडे यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले, त्यांचे रोप देऊन सत्कार केले आणि नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ समजावून दिला, त्याबद्दल मार्गदर्शन केले सोबतच आरोग्य विषयी जनजागृती करून शिवाजी नगर, नंदाजी नगर, भुतेश्वर नगर, चिटनाविसपुरा, सोनिया गांधी नगर, जुनी मंगळवारी ,झेंडा चौक, महाल येथील जवळपास पाचशे नागरिकांची नेत्र, दंत, आरोग्य तपासणी करून औषध वाटप करण्यात आले.