महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण
नागपूर समाचार, ता. १० : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ करिता नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूर शहराचे रँकिंग वाढविण्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी तीन ‘ब्रॅण्ड ॲम्बेसेडर’ची नियुक्ती करण्यात आली. यात ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे अध्यक्ष कौस्तुभ चॅटर्जी, पॅराऑलम्पिक भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान गुरुदास राऊत आणि माय एफएम रेडिओचे आरजे राजन या तीन विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. सोमवारी (ता. १०) महापौर कक्षात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते नवनियुक्त ‘ब्रॅण्ड ॲम्बेसेडर’ला नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ.गजेन्द्र महल्ले, स्वच्छ भारत अभियान कक्षाचे अनित कोल्हे, ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या सुरभी जयस्वाल, श्रिया जोगे, मेहुल कोसूरकर, अशोक काटेकर, नामेश्वर श्रीरामे आदी उपस्थित होते. या ‘ब्रॅण्ड ॲम्बेसेडर’च्या माध्यमातून नागपूर शहरात स्वच्छतेबद्दल जनजागृती करून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येणार आहे.
ओला आणि सुका कचरा विलगीकरणास प्राधान्य : कौस्तुभ चॅटर्जी
ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे अध्यक्ष कौस्तुभ चॅटर्जी यांनी ओला आणि सुका कचरा विलगीकरणाला प्राधान्य देणार असल्याचे सांगतिले. ते मागील २८ वर्षांपासून पर्यावरण संरक्षणासाठी काम करीत आहेत आहेत. तसेच मागील १२ वर्षांपासून ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे संस्थापक आहेत. नागपूर शहराला स्वच्छ बनविण्यासाठी या मोहिमेत युवकांना सहभागी आवश्यक आहे. नागरिकांमध्ये सिंगल युज्ड प्लॉस्टिशक वापराबाबत जनजागती करून या स्वच्छ सर्वेक्षणात शहरातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग घेतल्याहस नागपूर शहराची रँकिंग नक्कीच वाढेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांची मानसिकता बदलविणे आवश्यक : गुरूदास राऊत
’सुबह की ताजी हवा, दुर करे दवा‘ असे म्हणत पॅराऑलम्पिक भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान गुरूदास राऊत यांनी लोकांची मानसिकता बदलविणे आवश्यक असल्या्चे सांगितले. शहर, आपल्यां आजूबाजूचा परिसर हे आपले घर आहे, अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण करण्याची नितांत गरज आहे. अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाल्यापस हे शहर नेहमीच स्वच्छ आणि सुंदर राहील. ज्याभप्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो त्या च प्रमाणे आपण आपले शहरसुध्दा स्वच्छ ठेऊ शकतो. विविध कार्यालयात जाऊन स्वच्छतेविषयी जनजागृती व पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यावर भर देणार असल्यालचे गुरूदास राऊत यांनी यावेळी सांगितले.
गुरूदास राऊत हे २०२०च्या पॅराऑलम्पिक भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान होते. त्यांुनी २०१९चा वर्ल्ड कप सुद्धा जिंकून दिला, ते मागिल १३ वर्षांपासून क्रिकेट खेळत आहेत.
शहर स्वच्छतेसाठी स्वकता: पुढाकार घेणे आवश्यक : आरजे राजन
काम कोणतेही असो त्यात स्वरता: पुढाकार घेणे आवश्यक आहे. रेडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्वच्छतेविषयी जनजागृती करणार, स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून देणार असल्यािचे माय एफएम रेडिओचे आरजे राजन यांनी यावेळी सांगितले.
आरजे राजन हे मागील १३ वर्षांपासून रेडिओ मध्ये कार्यरत आहेत. त्यांयनी टेलिव्हिजनवर मोठे-मोठे शो, सिंगिंग कार्यक्रमसुध्दा केलेले आहेत.