गेल्या २४ तासात शहरात २४०७ नवीन कोरोना बाधितांची नोंद
नागपूर समाचार, १८ जानेवारी : नागपूर शहरासह पूर्व विदर्भात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने जोर पकडला असून दैनंदिन रुग्णसंख्येचे वाढणारे आकडे हे या लाटेची तीव्रता व्यक्त करीत आहे. नागपूर शहरात मागील आठवड्यापासून रुग्णसंख्या २ हजारांच्या घरात गेली आहे. स्थिर असणाऱ्या मृत्युसंख्येचा आकडाही आता वाढू लागला आहे. गेल्या २४ तासात नागपूर जिल्ह्यात २४०७ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरात सुरु झालेले निर्बंधही कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यात अयशस्वी ठरत आहेत. गेल्या २४ तासात शहरात २४०७ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता ५१३९३० वर पोहोचली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये ३९३ रुग्ण ग्रामीण भागातील, १९६५ शहरातील तर ४९ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत. मागील चार दिवसांपासून सुरु असलेले कोरोना मृत्यूचे सत्र आज थांबले आहे, आज शहरात एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही, त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा १०१३६ वर स्थिर आहे.
आज शहरात एकूण ११२९६ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ३३९३ चाचण्या ग्रामीण भागात तर ७९०३ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात ७५६ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४८९४९८ वर पोहोचली आहे तर कोरोना मुक्तीचे प्रमाण ९५.२५ टक्क्यांवर गेले आहे. शहरात सध्या १४२९६ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यातील २६४६ रुग्ण ग्रामीण भागातील तर ११५१५ शहरातील तर १३५ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत.