कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई
नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिके तर्फे सोमवारी (३१ जानेवारी) रोजी ३ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ७५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने धंतोली झोन अंतर्गत एम्प्रेस मॉल येथील अशोक खुराना यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ५०,००० च्या दंड वसूल केला.
त्याचप्रमाणे आशीनगर झोन अंतर्गत टेकानाका कामठी रोड येथील जे.पी.लॉन यांच्याविरुद्ध लग्न समारंभात कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करुन १५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.