समुद्रपुर तालुक्यातील कोरा सर्कलमधील १६ विविध कामांचे आ. समिर कुणावार यांचे हस्ते भूमिपूजन
हिंगणघाट समाचार : समुद्रपुर विधानसभा क्षेत्राचे आ.समिर कुणावार यांनी काल दि ४ रोजी समुद्रपुर तालुक्यातील कोरा सर्कल येथे सुमारे २ कोटि ५५ लाख,८९ हजार रुपये निधि खर्च करुन करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.
यात मुख्यतवे १६.९८ रुपये निधितुन रुनका-झुनका येथील पाणीपुरवठा पाइपलाइन तसेच पाणीपुरवठा योजना, ४८.८१लक्ष रुपये निधितुन दसोडा येथील तलावदुरुस्ती, वासी येथील २४.६० लक्ष रुपये जि.प.शाळा इमारतनिर्मिती, चिखली येथील ७ लाख रुपये निधितुन स्मशानभूमि रस्त्याचे सौंदर्यीकरण इत्यादि भूमिपूजनासह मंगरुळ येथील प्रवासी निवारा लोकार्पण, वासी येथील शालेय वास्तु लोकार्पण विकासकामांचा समावेश आहे.
समुद्रपुर तालुक्यातील कोरा हा जिल्हयातील सीमावर्ती भाग असून कोरा सर्कलमधील गावकऱ्यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन आ.vसमिर कुणावार यांच्या शुभहस्ते या क्षेत्रातील १६ विकासकामांचा भूमिपूजन तसेच सोहळा संपन्न झाला. यावेळी आ. कुणावार यांनी दोन विकासकामांचे लोकार्पणही केले.
याप्रसंगी आमदार समीरभाऊ कुणावार, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर भाऊ दिघे, जिल्हा परिषद सदस्य रोशनभाऊ चौके, भाजपा तालुकाध्यक्ष संजय डेहणे, पंचायत समिती सभापती सौ सुरेखा कैलास टिपले, पंचायत समिती उपसभापती योगेश भाऊ फुसे, माजी पंचायत समिती सभापती सौ. पुष्पांजलि किशोर नेवल, पंचायत समिती सदस्य वसंतराव घुमडे यांच्या उपस्थितीत सदर भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी अर्चना ननावरे, सरपंच झुनका, संजय सरपाटे, किशोर नेवल, मनोज बारस्कर , मोहन बाकरे ,रामभाऊ पांढरे, गुलाब चिंचोळकर, गोविंदा नन्नावरे, विनायक श्रीरामे, शिरीष पांढरे, केशव डंभारे, राजू कावळे
विलास तिमांडे सरपंच उसेगाव, देविदास होडके सरपंच खापरी, सारिका पोहीनकर, इस्माईल शेख, मनीषा माहुरे सरपंच चिखली, उपसरपंच संगीता घोंगडे, गजानन पुरी, काशिनाथ वरघने, दीपक राऊत , विनोद जांभळे, किसना गरमळे , बाबा कोसुरकर, मधुकर बोबडे, शांताराम जांभूळकर, कुसुम नारनवरे इत्यादी मान्यवर मंडळीसह ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.