NBP NEWS 24
13 FEB 2022
नागपुर:- रविवार दिनांक १३-२-२०२२ ला- रेणुका महाविद्यालय कोणार्क काँलनी, बेसा,नागपुर येथे भारतीय जनता पार्टी बेसा बेलतरोडी महिला आघाडी तर्फे बेटी बचाओ,बेटी पढाओ योजने अंतर्गत “सुदृढ बालक आणि सुदृढ माता स्पर्धाचा” भव्य कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात बालकांचा मातांनी उत्साह पुर्वक सहभाग घेतला. विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले. कोरोनाचा काळात आपल्याला सेवा देणाऱ्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या आशावर्कर प्रज्ञा भोंगाडे, ज्योती रेंगातूरे यांचा संध्याताई गोतमारे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून – अर्चना ताई डेहनकर प्रदेश सचिव, कार्यक्रमाचे अध्यक्ष संध्याताई गोतमारे ( जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी नागपुर ग्रामीण), विशेष उपस्थिती_ प्रितीताई मानमोडे (वेद्यकिय आघाडी अध्यक्ष),विषेष अतिथी शुभांगीताई गायधने – जिल्हा महामंत्री, प्रतिभाताई गवळी – जिल्हा महामंत्री, डाॅ. पुजा धांडे – महिला आघाडी अध्यक्ष, सुनीताताई बुचुंडे – पं.स सदस्य सरिता ताई यादव _(बेटी बाचाओ बेटी पाढाओ संयोजिका) उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शालिनीताई कंगाली (भा. ज.पा. म. आ. ना.ग्रा. मंत्री ,बेटी बचाओ बेटी पढाओ- सह संयोजिका ,माजी सरपंच/ सदस्य) यांनी केले आणि कार्यक्रमाचे संयोजन किर्ती बडोले (भा.ज.पा.बेसा अध्यक्ष ). लता इगंळे(भा. ज. पा. बेलतरोडी अध्यक्ष ग्रा. पं. सदस्य).*वैशाली ढोणे (भा.ज.पा.कार्याध्यक्ष माझी सदस्य) .गंगा गोल्हर,(सदस्य) . कल्पना सुके, (सदस्य) अंजली दिक्षीत.सुषमा.पारकर ,छाया शुक्ला, कल्पना कांबळे( माजी सदस्य)वंदना सोनटक्के यांनी केले।