बंजारा समाजाचे थोर संत जगतगुरू सेवालाल महाराज यांची जयंती म.न.पा.कार्यालयात साजरी
नागपूर समाचार : गोरबंजारा जमातीमध्ये संत सेवालाल महाराज हे मोठे संत आहे. संत सेवालाल महाराजांचा जन्म दिनांक १५ फेब्रुवारी, १७३९ रोजी बंजारा कुटूंबामध्ये गुलाल डोडी तांडा, ता.गुत्ती, जि.आनंदपूर (आंध्रप्रदेश) येथे झाला. मंगळवारी (ता.१५) संत सेवालाल महाराज यांची २८३ व्या जयंती प्रित्यर्थ म.न.पा. मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभा कक्षात जगतगुरु संत सेवालाल महाराज यांच्या फोटोला उपमहापौर मनीषा धावडे, अति.उपायुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. निर्भय जैन व रविन्द्र भेलावे यांनी नगरीतर्फे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी आशीनगर झोन सहा.आयुक्त श्री. गणेश राठोड, डॉ. विजय जोशी, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, बाजार अधिक्षक श्रीकांत वैद्य, सर्वश्री. धनंजय जाधव, विजय राठोड, अविनाश जाधव, अर्जुन मुडे, विनोद राठोड, गजानन जाधव, अनिल चव्हाण, महेंद्र वाघ, गोपाल राठोड व श्रीमती प्रियंका राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.