कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई
नागपूर समाचार : महानगरपालिके तर्फे गुरुवारी (१७ फेब्रुवारी) रोजी ०८ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ५५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत शंकरनगर येथील श्री साई सभागृह यांच्या विरूध्द अवैधरित्या डिस्प्ले बॅनर आणि बॅनर लावल्याबद्दल कारवाई करून रु १०,००० च्या दंड वसूल केला. तसेच कॅनल रोड, रविनगर येथील वीला ५५ यांच्या विरूध्द रस्त्यालगत कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून रु ५,००० च्या दंड वसूल केला.
त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत गणेशपेठ येथील नित्या शर्मा विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून रु १०,००० च्या दंड वसूल केला.
गांधीबाग झोन मधील महेश्वरी पंचायत, जैन भवन आणि कोलबा स्वामी संस्कृतीक भवन यांच्या विरूध्द कोविड नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून रु २०,००० च्या दंड वसूल केला. तसेच सतरंजीपूरा झोन येथील नाईक तलाव तांडापेठ येथील तेजराम नंदनवार यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून रु ५,००० च्या दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.