वाठोडा चौक व शिवाजी चौक येथे भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
नागपूर समाचार : पूर्व नागपुरातील वाठोडा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शनिवारी (ता. १९) शिवजयंती निमित्त दोन्ही चौकात पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे व नगरसेवक तथा भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला.
यावेळी शहर संपर्क प्रमुख प्रा. प्रमोद पेंडके, मंडळ अध्यक्ष संजय अवचट, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष सन्नी राऊत, उपमहापौर मनीषा धावडे, नगरसेविका कांता रारोकर, हरेश्वर रारोकर, प्रभाग अध्यक्ष त्रयी राजेश संगेवार, सुरेश बारई व अशोक देशमुख, अभय मोदी, राजूभाऊ खरे, ओबीसी मोर्चा शहर महामंत्री मनोहर चिकटे, अनंता शास्त्रकार, विनोद बांगडे, विनोद कुट्टे, मधुकर बारई, सुशील गुघाणे, जगदीश मानकर, दिपक पाटील, सुरेश उदापूरकर, मयूर घोंगे, राहूल पद्मावत, ज्योती वाघमारे, कल्पना सारवे, गायत्री उचितकर, शारदा बारई, कविता हत्तीमारे, करूणा पाटील, विशाल बेहनिया, ऋषिकेश पराळे, रवींद्र शर्मा, राहुल मेश्राम, शुभम तिवारी, दिपक भैसकर, प्रज्वल भैसकर, ओम ठवकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.